लाडकी बहीण आणि शिलाई मशीन योजनेचा प्रवास झाला त्रासदायक सी.एस.सी. सेंटर, नगर परिषद, जिल्हा उद्योग केंद्राला मारावे लागताहेत हेलपाटे कागदपत्र जमा करून घ्यायला नाही कुणी तयार; लाडक्या बहिणी झाल्या बेजार!
बीड (एस.एम.न्युज़) - लाडकी बहीण आणि शिलाई मशीन योजनेचा प्रवास आता त्रासदायक झाला असून लाडक्या बहिणींसोबतच माता-भगिनींना सी.एस.सी. सेंटर, नगर परिषद, जिल्हा उद्योग केंद्राला हेलपाटे मारावे लागत आहे. कारण त्यांच्याकडे कागदपत्रे जमा करून घ्यायला कुणीही तयार नसल्याने लाडक्या बहिणी बेजार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच महिलांना उद्योगात चालना मिळावी याकरिता शिलाई मशीन योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या माता भगिनी वास्तविक पाहता मोफत होणारी नाव नोंदणी सीएससी सेंटरवर जाऊन पैसे मोजून जेव्हा नाव नोंदणी करून घेऊ लागले, तेव्हा तिथून त्यांना रजिस्ट्रेशन केलेले काही कागद मिळू लागले. त्यांच्याकडून ते नगर परिषद मध्ये जमा करून घेतले जात होते परंतु आता कालपासून नगर परिषदेतील स्वर्ण जयंती विभागातील अधिकारी या दोन्ही योजनांचे कागद घेण्यास नकार देत असून ते कागदपत्र सीएससी सेंटर वाल्यांकडेच जमा करा म्हणून सांगू लागले आहे. यामुळे महिला परत सीएससी सेंटर वाल्यांकडे ती कागदं घेऊन जाऊ लागल्या तर सीएससी सेंटर वाले त्यांना सांगू लागले की, आम्हाला नगर परिषदेतील सुवर्ण जयंती विभागात असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कागदपत्र जिल्हा उद्योग केंद्राकडे जमा करा म्हणून तुम्ही आता जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन ते जमा करा. यामुळे महिला भगिनी जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन त्यांची कागदपत्रे जमा करून घ्या म्हणून विनवण्या करु लागल्या मात्र जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी सुद्धा आम्हाला शासनाकडून याबद्दल काहीच निर्देश आलेले नाहीत. तुमची कागदपत्रे आम्ही जमा करून घेऊ शकत नाही. शासनाकडून निर्देश आल्यानंतर आम्ही ते जमा करून घेऊ शकतो. असे म्हणून माता, भगिनींकडून कागदपत्र न स्वीकारता आल्या पावली परत पाठवत आहेत. यामुळे माता भगिनींना सीएससी सेंटर ते नगर परिषद, नगर परिषद ते पुन्हा सीएससी सेंटर आणि तेथून जिल्हा उद्योग केंद्राकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे लाडक्या बहीणींचा पंधराशे रुपये आणि माता-भगिनींचा शिलाई मशीन योजनेचा प्रवास त्रासदायक झाला असून त्यांना यासाठी सी.एस.सी. सेंटर, नगर परिषद आणि जिल्हा उद्योग केंद्राला हेलपाटे मारावे लागत आहे. त्यांच्याकडून कागदपत्रं जमा करून घ्यायला कुणीही तयार नसल्याने लाडक्या बहिणी आणि माता-भगिनी बेजार झाल्या आहेत.
अशिक्षित किंवा अल्प शिक्षितपणामुळे होतेय बेजारी!
शासनाने महिलांसाठी कोणत्याही योजना घोषित केल्या तर त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे आलेल्या महिला या बहुतेक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. यामुळे संबंधित योजनांचा लाभ घेण्याकरिता करावे लागणारे कार्य त्या चांगल्या मार्गदर्शनाविना करू शकत नाहीत. सध्या ऑनलाईन चे युग असल्यामुळे अशा महिलांना मार्गदर्शन केले तरीही लवकर समजत नाही. म्हणून अशिक्षित किंवा अल्पशिक्षित माता भगिनींना शासनाकडून त्यांच्यासाठी घोषित केलेल्या योजनात सहभाग नोंदविताना अनेक हाल सोसावे लागतात व त्रासही सहन करावा लागतोय.
ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर कागदपत्र जमा करायची खरेच गरज आहे का?
ऑनलाइन कागदपत्र दाखल करून घेतल्यानंतर सीएससी सेंटर वाल्यांकडून मिळालेली प्रत कोणत्याही कार्यालयात नेऊन दिल्यावर त्याची ओसी मिळाली तर त्याला काहीतरी अर्थ आहे. लाडकी बहीण योजना असो की, शिलाई मशीन योजना. या दोन्ही योजनांची कागदपत्रे जोपर्यंत नगर परिषदेत घेण्यात आली तोपर्यंत फक्त महिलांकडून घेऊन ठेवून देण्यात आली आहेत. त्याची कुठलीही ओसी महिलांना देण्यात आलेली नाही. यामुळे या दोन्ही योजनांची कागदपत्रे कोणत्याही कार्यालयात जमा केली काय किंवा नाही केली काय, त्याला काहीही अर्थ नाही. हे पाहता ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर कागदपत्र जमा करायची खरेच गरज आहे का? असा मुद्द्याचा प्रश्न उभा राहत आहे.
=====================================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
एस.एम.युसूफ़
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा