Breaking News

लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यापेक्षा त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण मोफत द्या हो गरीबी, हलाखीमुळे एका बहिणीचा मुलगा डोळे आणि हाताने झाला अपंग; मायबाप सरकार लक्ष द्या रं!


बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या घाटेवाडी, ह.मु. विडा येथील पार्वती विकास हलकडे या ३५ वर्षीय बहिणीचा मुलगा आनंद हा सध्या इयत्ता दहावीत शिक्षण घेऊन मजुरीचे काम ही करतो. अशाच प्रकारे काम करत असताना त्याच्या हस्ते गुत्तेदाराने जिलेटीन लावण्याचे काम करून घेतले पण त्याचा वेळे आधीच विस्फोट झाल्याने आनंदचा एक डोळा निकामी झाला तर दुसऱ्या डोळ्यांनीही अस्पष्ट दिसत आहे. शिवाय उजव्या हाताचा अंगठा तुटला तर डावा हात कोपऱ्यापासून वाकडा झाला. अशा प्रकारे शिक्षण घेऊन पोटाची खळगी भरण्याकरिता काम करणाऱ्या आनंदला अपंगत्व आले आहे. एकीकडे हे विदारक दृश्य तर दुसरीकडे मायबाप सरकार कडून लाडक्या बहिणींना मतांकरिता गोंजारण्यासाठी १५०० रुपये देणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. आरं सरकार, लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यापेक्षा त्यांच्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण व जेवण मोफत देण्याचे सत्कार व पुण्य कर्म करा रं, असं म्हटल्याशिवाय राहवत नाही.
         याप्रकरणी आनंदची आई पार्वती बहिणीने पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मन हेलावून टाकणारी आहे. पार्वती बहिणीचे लग्न घाटेवाडी ता. केज येथील विकास प्रभु हलकडे यांचेसोबत झाले होते. विकास हलकडे यांच्यापासुन आनंद विकास हलकडे वय १५ वर्षीय मुलगा आहे. तो शिक्षण घेत मजुरी करतो. पती विकास याने लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांनीच पार्वती यांना सोडून दिल्याने त्या मुलगा आनंद सोबत राहतात. आनंद हा श्री. रामकृष्ण महाराज विद्यालय विडा, ता. केज, जि.बीड येथे ईयत्ता १० वी वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. पार्वती या मिळेल ती मजुरी करतात. गोकुळ शेषेराव ढाकणे रा. सारुळ ता. केज जि. बीड व शिवाजी ठोंबरे रा. दहीफळ वडमाऊली ता. केज यांची पार्वती यांच्याशी ओळख असल्याने त्या दोघांनी आनंद यास त्यांच्या विहीरीवर बार घेण्याच्या ट्रॅक्टरवर सोबत कामाला पाठव, आम्ही त्याला ४०० रुपये रोज देतो. असे म्हटल्याने पार्वती बहिण मुलगा आनंद यास गोकुळ शेषेराव ढाकणे व शिवाजी ठोंबरे यांच्या ट्रॅक्टरवर पाठवत होत्या. आनंद हा विहीरीमध्ये होल घेवुन त्या होलमध्ये जिलेटीनच्या कांड्या टाकल्यानंतर त्या होलमध्ये वाळु टाकुन होल भरुन घेण्याचे काम करत होता. पाडव्याच्या दिवशी मंगळवार दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी गोकुळ शेषेराव ढाकणे, त्यांचे वडील शेषेराव ढाकणे व शिवाजी ठोंबरे हे आनंद ला त्यांच्या सोबत ट्रॅक्टरवर कामाला जोला गावामध्ये घेवुन गेले. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्या चाकरवाडीवरुन परत गावी येत असतांना त्यांना गोकुळ ढाकणे यांनी फोन केला व म्हणाले तुमच्याकडे काम आहे, तुम्ही कोठे आहात, असे विचारले असता  त्यांनी नांदुरफाटा येथे असुन गावी जात असल्याचे सांगीतले असता त्यांनी पार्वतींना बरडफाट्यावर थांबायला सांगीतले. म्हणून त्या नांदुरफाटा येथे थांबल्या असता गोकुळ ढाकणे मोटारसायकल घेवुन तेथे आला व पार्वतींना सोबत घेऊन बीड येथील दिप हॉस्पीटल येथे नेले. तिथे आनंद यास त्याने ॲम्बुलन्स मध्ये टाकले होते. आनंद यास ॲम्बुलन्स मध्ये का टाकले आहे, त्याला काय झाले आहे, असे विचारले असता तेथे असलेला शिवाजी ठोंबरे याने मला आनंदला काही झाले नाही, थोडा मार लागला आहे, त्याला जालन्याला दवाखाण्यात घेवुन जायचे आहे, असे म्हणुन शिवाजी ठोंबरे याने पार्वतींना ॲम्बुलन्सच्या कॅबीनमध्ये बसवले. पाठीमागे मुलगा आनंद, गोकुळ ढाकणे व शिवाजी ठोंबरे हे बसून रात्रीच्या सुमारास त्यांनी जालन्यामध्ये परिनिका हॉस्पीटल, जालना येथे तिथे आनंद ला पाहिल्यानंतर तो रक्तबंबाळ झालेला दिसला. त्याचे तोंडावर, पोटावर, हातावर पुर्ण जखमा होवुन रक्त निघालेले होते. तेव्हा मुलास दवाखाण्यात नेवुन तपासण्या केल्या. तेथुन गणपती नेत्रालयामध्ये नेवुन तेथेही आनंद च्या तपासण्या केल्या. परिनिका हॉस्पीटल, जालना येथे मुलगा आनंद यास चार पाच दिवस ॲडमीट केले. तेव्हा आनंद ला काय झाले, या बाबत विचारले असता जोला येथे विहीरीमध्ये होल घेतल्यानंतर दुपारी बारा वाजण्याचे सुमारास होलमध्ये मी व अनिल निंबोळे असे आम्ही जिलेटीन भरल्यानंतर मी त्यावर वाळु टाकत होतोत. शेषेराव ढाकणे हे होलमध्ये जिलेटीन भरत होते. तेव्हा अचानक स्फोट झाल्याने माझ्या अंगावर जिलेटीनच्या स्फोटने जखमा झाल्या आहेत, असे सांगीतले. त्यानंतर गणपती नेत्रालय, जालना येथे डोळ्याचे ऑपरेशन केले. मात्र आनंदाचा एक डोळा पूर्णतः निकामी झाला आहे तर दुसऱ्या डोळ्यांनी अस्पष्ट दिसत आहे. शिवाय उजव्या हाताचा अंगठा तुटला असून डावा हात कोपऱ्यापासून वाकडा झाला आहे. घरची गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले आहे. तेव्हा मायबाप सरकार हो अरं लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यापेक्षा बहिणींच्या मुला-मुलींना चांगले शिक्षण व जेवण मोफत द्यावे. म्हणजे अशाप्रकारे अजून कोणी आनंद अपंग होणार नाही रं.

तत्त्वशील कांबळे व बाल कल्याण समिती मुळे प्रकरण समोर आले

सदरील प्रकरण हे ०९ एप्रिल २०२४ रोजी घडले होते. यानंतर आनंद ची आई पार्वती बहीण या अनेकदा केज पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार काही नोंदवून घेतली नाही. तीन महिने उलटून गेल्यावर ही माऊली जेव्हा जिल्हा रुग्णालयात आनंद ला अपंग प्रमाणपत्र मिळावे म्हणून आली, तेव्हा हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्या नजरेत आले. मग त्यांनी आनंद ला बालकल्याण समिती पुढे हजर केले. यानंतर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, संतोष वारे, छाया गडगे यांच्या कमिटीने आनंद ची परिस्थिती पाहून व पार्वती बहिणीचे म्हणणे ऐकून घेतले आणि केज पोलिसांना पत्र देत गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तेव्हा कुठे केज पोलिसांना उशिराने सद्बुद्धी सुचली व गुन्हा दाखल करण्यात आला.

============================






"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

एस.एम.युसूफ़

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत