Breaking News

ओबीसी आरक्षणातील अन्याय दूर करण्याकरिता कवठेकर मामाच्या आंदोलनाला आर्थिक मदतीची गरज ! संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मदतीसाठी पुढे यावे - एस.एम.युसूफ़


बीड (एस.एम.न्युज़) - सन १९९४ पासून ओबीसी आरक्षणातून होत असलेला अन्याय दूर करण्याकरिता कवठेकर मामांनी सुरू केलेल्या आंदोलनाला न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात आहे. यासाठी समाजातील सजग, दक्ष, जागरूक व दानशूर लोकांनी पुढे येऊन या आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील मराठा, मुस्लिम, जैन, माहेश्वरी, ब्राह्मण, लिंगायत, मारवाडी आदी समाजाच्या नागरिकांना न्याय मिळावा याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यासाठी पुढे यावे. असे कळकळीचे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
        याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, ओबीसी आरक्षण दुरुस्तीची याचिका दाखल करण्यासाठी २२ लक्ष रूपयांची गरज आहे. सन १९९४ पासून लागू करण्यात आलेले ओबीसी आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचे कवठेकर मामांनी पुर्ण अभ्यास करून आकडेवारीसह समाजासमोर आणले आहे. १९९४ मध्ये काँग्रेसचे शरद पवार सरकार असताना त्यात मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी गनिमी कावा करत धोक्याने ओबीसी ची संख्या मोठ्या प्रमाणात फुगवून सांगत चुकीच्या पद्धतीने तत्कालीन सरकारसह जनतेच्या डोक्यात आणि डोळ्यातही धूळफेक करत सदरील आरक्षण लागू केलेले आहे. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या आरक्षण वाटपातील दुरुस्ती करण्याकरिता आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करावयाची आहे. यासाठी कवठेकर मामांनी २२ लक्ष रुपये लागणार असल्याची माहिती या अगोदर प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहीर केलीच आहे. नागरिकांनो, हे बेकायदेशीर आरक्षण दुरुस्त झाल्यास ओबीसींना दिलेल्या ३२ टक्के आरक्षणापैकी २७ ते २८ टक्के कोटा खुला होऊ शकतो. ज्याचा लाभ राज्यातील साडेआठ कोटी जनतेला होऊ शकतो. तरी खुल्या वर्गातील संपूर्ण महाराष्ट्रातील सजग, दक्ष, जागरूक व दानशूर नागरिकांनी या लढ्याचे  महत्त्व ओळखून कवठेकर मामाच्या बँक व फोनच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी आणि आरक्षणाच्या या लढ्यात खारीचा का होईना वाटा उचलावा. असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी केले असून आर्थिक मदत जमा करण्यासाठी त्यांनी कवठेकर मामाच्या एसबीआय खाते क्रमांक - ३० ८९ ७७ १९ ४४१, आय.एफ.एस.सी.कोड एस.बी.आय.क्र.०२००२८ व पेटीएम साठी ९० ४९० १३७५१ हा फोन क्रमांक ही दिला आहे.

बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़, आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत