Breaking News

महेदवीया दायरा कब्रस्तान ची व्यथा पंतप्रधानांपासून नगराध्यक्षांपर्यंत !

तेलंगणा च्या एल.एम.एम.ग्रुपने दुरावस्था सुधारण्याची केली मागणी !

बीड (एस.एम.न्यूज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान ची व्यथा तेलंगणा राज्यातील एल.एम.एम.ग्रुप ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,
 नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे या सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मांडली असून कब्रस्तान च्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे काढून कब्रस्तान ची झालेली दुरावस्था सुधारण्याची मागणी केली आहे. याविषयी उपरोक्त सर्वांना ई-मेल, रजिस्टर्ड पोस्ट आणि ट्विटर च्या माध्यमातून लाईक माइंडेड महेदवीज़ (एल.एम.एम.) ग्रुप तेलंगणा चे अध्यक्ष डॉक्टर सय्यद अली दिलावर (फार्रूख) यांनी निवेदने पाठवली आहे. यावर त्यांचे नाव, सही व शिक्के आहेत. अशी माहिती कब्रस्तान च्या दुरावस्थेबद्दल गेल्या सात वर्षां (इ.स.२०१४) पासून सातत्याने संघर्ष करणारे शहरातील मुक्तपत्रकार तथा जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी चे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

       महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दुरावस्थेबद्दल उपरोक्त सर्वांना पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, स्थानिक गुंडांकडून जमीन अतिक्रमण आणि मुस्लिम महेदवीया समाजातील हज़रत बंदगी मियांँ सय्यद शाह आलम (र.अ.) बीड शहरातील (महाराष्ट्र) दर्गाह शरीफच्या बिघडलेल्या स्थितीवर बीड नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

     येथे ह. बंदगी मियांँ सय्यद शाह आलम (र.अ.) यांची मज़ार आहे. ते ह. बंदगी मियांँ शाह-ए-याकूब हसन-ए-विलायत (र.अ.)(यांची मज़ार दौलताबाद जि.औरंगाबाद) यांचे पुत्र आहेत. अंजुमन ए महेदवीया बीड ने गेल्या काही वर्षात बीड नगरपालिकेस कब्रस्तान च्या दुरावस्थेबाबत अनेक तक्रारी, निवेदने, स्मरणपत्रे देऊनही मुस्लिम महेदवीया समुदायाच्या कब्रस्तान व मोकळ्या जागेबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

          जगभरातील यात्रेकरू नियमितपणे ज़ियारत साठी येथील दरगाह  शरीफ़ला येतात. बीडच्या सभोवतालच्या मुस्लिम महेदवीया समुदायातील सदस्यांचे दफ़न दरगाह शरीफ़च्या आवारात केले जाते.

         

          हज़रत सय्यद मुहम्मद जौनपुरी इमाम मेहदी (अ.ह.स.) यांचा जन्म १४ जमादील अव्वल ८४७ हि. (इसवी सन १४४३) सोमवार रोजी जौनपूर, उत्तर प्रदेशात झाला. त्यांचे नामदार वंशज जगभरात विखुरलेले आहेत. महेदी (अ.ह.स.) हे हज़रत अली (र.अ.) आणि हज़रत बीबी फातिमा (र.अ.) यांच्या वंशकुळातील होते. त्यांचे ९१० हि. (इसवी सन १५०६) मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी अफगाणिस्तानातील फराह येथे निधन झाले. तेथेच त्यांची मज़ार आहे.

          बहुसंख्य मुस्लिम महेदवी हे भारतासह  पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्की, अझरबैजान आणि इराणमध्येही वास्तव्यास आहे. यासह आता व्यापार-उदिम व नोकरी निमित्ताने असंख्य महेदवी लोक यूएसए, कॅनडा, यूके आणि ऑस्ट्रेलियासह बर्‍याच पाश्चात्य देशांमध्येही स्थलांतरित झाले आहेत.

         अहेमदनगर येथील हज़रत सय्यद शाह शरीफ़ (र.अ.) यांची मज़ार दर्गाह दायरा येथे स्थित आहे. ते हज़रत महेदी माऊद (अ.ह.स.) चे चौथे ख़लिफ़ा हजरत बंदगी मियांँ शाह दिलावर रजि.(बोरखेडा बु.चाळीसगाव)चे नातू होते.

        छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्री. मालोजीराजे भोसले साहेबांचा असा विश्वास होता की, अहेमदनगर मधील हज़रत सय्यद शाह शरीफ़ (र.अ.) दर्गा येथे प्रार्थना केल्यावरच त्यांना आपल्या दोन मुलांचा आशीर्वाद मिळाला. म्हणूनच त्यांनी आपल्या दोन मुलांचे नाव हज़रत च्या नावावर ठेवले होते. शाहजी आणि शरीफ़जी. शाहजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील तर शरीफ़जी हे चुलते होते.

      अशी शतकानुशतकांची परंपरा लाभलेल्या जमाअत ए महेदवीया च्या बीड येथील दायरा कब्रस्तान च्या मोकळ्या जागेवर स्थानिक गुंडांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. कब्रस्तान ची दुरावस्था झालेली आहे. परंतु बीड नगरपालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने बीड शहरातील महेदवीया दायरा कब्रस्तान व दर्गाह साठी तातडीने कार्यवाही करावी. अशी मागणी तेलंगणा येथील लाईक माइंडेड महेदवीज़ (एल.एम.एम.) ग्रुप चे अध्यक्ष डॉ. सय्यद अली दीलावर (फार्रूख) यांनी संबंधित सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांना ई-मेल, रजिस्टर्ड पोस्ट आणि ट्विटर च्या माध्यमातून पाठवलेल्या निवेदनातून केली असल्याची माहिती कब्रस्तान च्या दुरावस्थेबद्दल   गेल्या सात वर्षां (इ.स.२०१४) पासून सातत्याने संघर्ष करणारे शहरातील मुक्तपत्रकार तथा जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी चे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. 


जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान बीड (महाराष्ट्र) ची अत्यंत वाईट अवस्था😞😞😞

पहा हा संपूर्ण व्हिडीओ👉


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -


एस.एम.युसूफ़

मुख्य संपादक तथा कार्याध्यक्ष - जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड.

संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत