Breaking News

शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी तात्काळ पिक कर्ज द्या - भाई विष्णुपंत घोलप


पाटोदा (एस.एम.न्युज़) - सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्थीक अडचण येऊ नये म्हणून दरवर्षी मे महिन्यात खरीप पिक कर्ज प्रकरणाची सुरुवात होत असते. परंतु मे महिना पूर्ण संपला तरी ही खरीप पिक कर्ज प्रकरणे दिनांक ३० मे २०२१ पर्यंत कोणत्याही बॅकेत सुरुवात झालेली नाही. कोरोना मुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार आज बाजार बंद असल्यामुळे देवाण-घेवाण कोठेही होत नाही. तसे पाहीले तर गेल्या वर्षाची कर्ज प्रकरणे सुध्दा अद्याप पर्यंत तसेच पडून आहेत.

       त्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व बॅकांच्या प्रतिनिधी ची बैठक घेऊन त्या बॅकांच्या वरिष्ठाना लेखी स्वरूपात पत्र देऊन शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज तात्काळ मिळण्यासाठी आदेश द्यावेत. नसता शेतकऱ्यांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केले आहे. या निवेदनाच्या प्रति मा.ना. धनंजयजी मुंडे (सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री बीड.), शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा.आ.भाई जयंत पाटील, आष्टी / पाटोदा / शिरुर विधानसभा सदस्य मा.आ.बाळासाहेब आजबे (काका) यांना माहितीस्तव पाठविले आहे.

==========================

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -

एस.एम.युसूफ़

मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,

आसेफ़ नगर, बीड.

संपर्क - 9021023121

E-mail :- smyusuf4371@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत