कलाकारांना आर्थिक मदत द्या संघ क्रांती कलापथकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
याविषयी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कला पथकातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारी च्या अगोदर सांस्कृतिक व जनजागृती पर कार्यक्रमाच्या माध्यमातून उदरनिर्वाह व्हायचा परंतु सर्वच शासकीय कार्यक्रम बंद असल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सर्व कलावंतांसमोर उभा राहिला आहे. आमच्या कलापथकाने जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम, स्त्री भ्रूण हत्या अशा विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम केलेले आहेत परंतु कोरोना महामारी च्या काळात सर्व कार्यक्रम गेल्या चौदा महिन्यांपासून बंद असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या स्तरावर कलाकारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कला पथकासह इतरही सर्व कलावंतांना आर्थिक मदत देऊन कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून निवेदनावर शकुंतला ससाने, आकाश जाधव, शाम माने, एम.एम.शेख, अस्मिता आहिरे, निशा उजगरे, संध्या जाधव, आशाबाई तुरुकमारे, महेश पाटील, विनोद सवाई आदींची नावे व सह्या आहेत.
======================
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क :-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्यूज,
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121
E-mail :- smyusuf4371@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा