रिक्षाचालकांचे रमजान व ईद पैशांविना वांझोटेच ! शासनाच्या दीड हजाराची फक्त घोषणाच; सधनांनी मदत करण्याची गरज - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या चौदा महिन्यांच्या काळात सातत्याने लावण्यात येणाऱ्या लॉक डाऊन मुळे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही रिक्षाचालकांचे रमजान व ईद पैशांविना वांझोटेच जाणार असून शासनाकडून येणाऱ्या दीड हजार रुपयांची फक्त घोषणाच ठरली असल्याने सधनांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.
याविषयी सविस्तर असे की, २२ मार्च २०२० पासून आळीपाळीने लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉक डाऊन चौदा महिन्यांनंतर ही जनतेचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने रिक्षाचालकांसमोर फार मोठी आर्थिक समस्या उभी राहिली आहे. गेल्या वर्षीही सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना रमज़ान व ईद पैशांविना साजरा करत आले नव्हते. लॉक डाऊन काळात रिक्षांचे चक्काजाम असल्याने आर्थिक दृष्ट्या रिक्षाचालकांची परिस्थिती डबघाईस आली आहे. यामुळे अनेक रिक्षा संघटनांनी शासन दरबारी या अवस्थेबाबत निवेदनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या घोषणेला अनेक दिवस उलटूनही शासनाकडून ही रक्कम अद्याप पर्यंत रिक्षाचालकांना देण्यात आली नाही. तसेच गेल्या चौदा महिन्यांपासून सातत्याने लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊन मुळे समाजातील सधनांनी सुद्धा हात आखडते घेतल्याने गोरगरिबांसह रिक्षाचालकांसमोर स्वतः सह कुटुंबियांच्या उदरभरणाचा प्रश्न उग्र झाला आहे. दोन वेळेस च्या जेवनाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा वातावरणात सुरू झालेला पवित्र रमज़ान महिना व ईद समाजातील इतर सर्वसामान्य गोरगरिबांसह रिक्षाचालकांना सुद्धा पैशांविना आला तसा जात आहे. शासनाने जाहीर केलेली दीड हजार रुपयांची आर्थिक मदत सुद्धा अजून आली नसल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. अशा अवस्थेमध्ये रमज़ान व ईद रिक्षाचालक व त्यांच्या कुटूंबियांसाठी वांझोटे जाणार असल्याने सधनांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.
एस.एम.युसूफ
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़ ,
बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा