Breaking News

नाली काढली;आता औषध व धूर फवारणी करून नागरिकांना डासांच्या त्रासापासून वाचवा - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर बीड नगर परिषदेने आसेफ़नगर येथील तुडूंब भरलेली नाली काढली. आता नालीमध्ये औषध फवारणी तर प्रभागातील घराघरात धूर फवारणी करून नागरिकांना डासांच्या त्रासापासून वाचवावे. अशी मागणी केली आहे.
 याविषयी सविस्तर असे की, दिनांक ११ एप्रिल २०२१ रविवार रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील आसेफ़नगर येथील अकबर किराणा दुकान गल्लीची तुडुंब भरलेल्या नाली विषयी "आसेफ़नगर मध्ये डासांचा उच्छाद,नाल्या काढा; धुरफवारणीसाठी रिक्षा ऐवजी कर्मचारी पाठवा" या शीर्षकाने स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत दिनांक 13 एप्रिल रोजी बीड नगर परिषदने येथे सफाई कर्मचारी पाठवून तुडुंब भरलेली नाली काढली व नालीतील घाण ट्रॅक्टर मध्ये भरून नेली. नालीतील बरबटलेली घाण काढण्यात आल्याने  तसेच दुसऱ्याच दिवशी बीड नगर परिषदेने बातमीची दखल घेतल्याने येथील रहिवाशांना हायसे वाटले नसल्यास नवल. बीड नगरपरिषदेने नाली काढून साफ केली याचे आभार आहेच, परंतु आता घाण मुक्त झालेल्या नालीमध्ये औषध फवारणी व घराघरात धूर फवारणी करून येथील नागरिकांना डासांच्या त्रासापासून वाचवावे. येथील गल्ली अरुंद असल्याने फवारणीसाठी रिक्षा ऐवजी कर्मचारी पाठवावे. अशी मागणीही केली आहे. 

आपला 
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत