इस्लाम धर्मात वाढदिवस साजरा करण्यास परवानगी नाही - मुफ़्ती मुहम्मद आरिफ़ साहब
बीड (एस.एम.न्युज़) - अलीकडच्या काही वर्षात आपल्या देशात इतर धर्मियांसह इस्लाम धर्माचे अनुयायी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरे करत असल्याने याबाबत इस्लाम धर्माचे धर्मगुरू मुफ़्ती मुहम्मद आरिफ़ साहब आरेफ़ी यांच्याकडे विचारणा केली असता, मुफ़्ती साहेबांनी लिखित फ़तवा दिला की, इस्लाम धर्मात वाढदिवस साजरा करण्यास परवानगी नाही.
याविषयी उर्दू भाषेतून दिलेल्या लिखित फतव्याचे मराठी भाषांतर पुढील प्रमाणे नमूद केले आहे - वाढदिवस साजरा करणे ही पाश्चिमात्त्य देशातून आलेली संस्कृती आहे. पाश्चिमात्त्य देशांमध्ये येशू ख्रिस्तांचा वाढदिवस साजरा केला जातो. परंतु इस्लाम धर्मात इतर धर्माचे अनुकरण करण्यास सक्त मनाई केलेली आहे. याबाबत फ़तावा-ए-हक़्क़ानिया मध्ये स्पष्ट केले आहे की, वाढदिवस साजरा करणे ही इंग्रजांची संस्कृती आहे. परंतु याचे वाईट वाटते की, ही संस्कृती इस्लाम धर्मीय काही मुस्लिमांनी अंगिकारली आहे. शरियत-ए-इस्लामिया मध्ये याची बिलकुल परवानगी नाही. खरे म्हणजे हे जीवन अल्लाह तआला ने मानवाला दिलेली भेट आहे. जे लोक याला अल्लाहने निर्देश दिल्याप्रमाणे जगतात त्यांच्यावर अल्लाहची कृपा होते. जे लोक अल्लाह चे निर्देश डावलून, त्याकडे कानाडोळा करून जीवन जगतात अल्लाह त्यांची प्रगती थांबवितो. प्रत्येक मानवाला अल्लाहच्या दरबारात आपल्या जीवनाचा हिशोब द्यावा लागणार आहे. वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी विचार करावा की, जीवनातील आयुष्य कमी होत असताना त्याचा आनंद मानावा की, आपल्याकडून झालेल्या चुकांची अल्लाह कडे माफी मागावी. जीवनाचे जेवढे वर्ष कमी झाले तेवढ्या मोमबत्त्या विझवून, इंग्रजांसारखे मिठाई वाटप करणे, टाळ्या वाजून केक कापल्यास अल्लाहच्या दरबारात या कृत्याची सफ़ाई कशी देताल ? मनासारखे केक बनवण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते. जी व्यर्थ आहे. क़ुरआन मध्ये व्यर्थ खर्च करणाऱ्यांना राक्षसांची उपमा दिलेली आहे. जीवनाचे वर्ष कमी होत असताना आपली ऐपत असल्यास गरजू व गोरगरीब लोकांना दानधर्म करून पुण्य कमवावे. ज्यामुळे आयुष्यात भरभराट होईल. या ऐवजी जर लोक दरवर्षी वाढदिवस साजरे करू लागले, तर यामुळे नवीन पिढीवर वाईट व अनिष्ट परिणाम होईल. आणि इंग्रजांची प्रथा साजरी करण्यास सुद्धा ते आपली प्रथा समजतील. यामुळे नुकसान उचलावे लागेल. फ़तावा-ए-रहिमीया मध्येही आहे की, वाढदिवस साजरा करणे ही इंग्रजांची पद्धत आहे. मुस्लिमांनी लक्षात घ्यावे की, वाढदिवसा निमित्ताने केक कापणे, मोमबत्त्या विझवणे, टाळ्या वाजविणे, फटाके वाजविणे आणि नाचगाणे करणे यापासून लांब रहावे. नाहीतर वाढदिवस साजरे करणाऱ्यांचे इमान ख़राब व भ्रष्ट होऊन दुषित होईल. हा फ़तवा मुफ़्ती मुहम्मद आरिफ़ साहब आरेफ़ी यांनी इस्लामिक तारखेनुसार २८ रज्जब १४४२ हिजरी रोजी दिला आहे.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
तथा मुक्त पत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा