शुभविवाह अन निक़ाह सोशल संस्थेकडून पत्रकार एस.एम.युसूफ़,ज़ुबेर सिद्दिक़ी यांचा सत्कार!
बीड (एस.एम.न्युज) - येथील शुभविवाह अन निक़ाह सोशल संस्थेच्या कार्यालयास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड शहराध्यक्ष ज़ुबेर सिद्दिक़ी यांनी सदिच्छा भेट दिली असता मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शुभविवाह अन निक़ाह सोशल संस्था लग्न जुळविण्याचे करत असलेले कार्य महिलांसाठी वरदान असून हे पुण्यकार्य करणाऱ्या संस्थेच्या पाठीशी मी आणि माझा पक्ष सदैव खंबीरपणे उभा राहून यासाठी लागेल ते सहकार्य करणार आहे. याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
याचवेळी काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजातील विधवा महिला, विधुर पुरुष, घटस्फोटीत महिला-पुरुष तसेच लग्नाचे वय झालेले परंतु आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने लग्न होऊ शकत नसलेल्या तरुण मुला-मुलींबाबत मुस्लिम धर्मगुरूंना उद्देशून या मुद्द्याला प्रसिद्धी माध्यमाद्वारे वाचा फोडणारे पत्रकार एस.एम.युसूफ यांनी सामाजिक जाण ठेवून केलेल्या लिखाणाची नोंद घेत त्यांचाही संस्थेतर्फे हृदयी सत्कार करण्यात आला. हा छोटेखानी सत्कार समारंभ शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेचे अध्यक्ष आय.एम.काजी, सचिव सय्यद शहिंशहा अहेमद, उपाध्यक्ष सय्यद शोएब उज ज़मा यांच्या हस्ते पार पडला.
संपादक, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा