Breaking News

बीड शहरातील नवीन सार्वजनिक सदोष मुताऱ्यांची दुरुस्ती होणार!
पत्रकार एस.एम.युसूफ यांच्या मागणीला यश
बीड (एस.एम.न्युज) - काही महिन्यांपूर्वी बीड शहरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सदोष मुताऱ्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांच्या पत्रानंतर बीड नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी संबंधित गुत्तेदाराला दिल्याने पत्रकार एस.एम.युसूफ यांनी केलेल्या मागणी ला यश आले आहे.
           काही महिन्यांपूर्वी बीड शहरातील मुख्य रस्त्यांलगत असलेल्या नाल्यांवर बीड नगर परिषद कडून सार्वजनिक मुताऱ्या बांधण्यात आल्या. परंतु मुताऱ्या बनविताना त्या सदोष बांधल्या गेल्या. ज्या भांड्यामध्ये मूत्र विसर्जन करायचे आहे ते भांडे आवश्यकतेपेक्षा जास्त उंच लावण्यात आले. यामुळे मुताऱ्यात भांडे असूनसुद्धा लघवी करणाऱ्यांना त्यात मूत्रविसर्जन करता येत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन दि.२७ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना याबाबत सविस्तर माहिती देत निवेदन देण्यात आले होते. ज्यात मागणी करण्यात आली होती की, एक तर मुतार्‍यांमधील मुत्र विसर्जनाचे भांडे खाली घ्यावे किंवा ज्या उंचवट्यावर उभे राहून लघवी करायची आहे ते उंचवटे कमीत-कमी चार ते पाच इंच उंच करावे. नाहीतर लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या मुताऱ्या अडगळीत पडण्याची शक्यता होती. म्हणून याबाबत दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. प्रसिद्धी माध्यमातूनही वाचा फोडली होती. याची नोंद घेत जिल्हाधिकारी साहेबांनी बीड नगर परिषदेला सदोष मुताऱ्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. असे पत्र देऊन उत्तर मागविले. यामुळे बीड नगर परिषदच्या मुख्याधिकार्‍यांनी या सदोष मुताऱ्या बनविणाऱ्या गुत्तेदारासह अभियंत्याला पत्र काढून सदोष मुताऱ्यांची दुरुस्ती करून देण्याचे आदेश निर्गमित केल्याने याविषयी निवेदनाद्वारे लक्ष वेधणारे पत्रकार एस.एम.युसूफ यांच्या मागणीला यश आले आहे. 

एस.एम.युसूफ 
संपादक,एस.एम.न्युज,बीड.
संपर्क - 9021 02 3121. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत