ऐतिहासिक राजुरीवेस चे नूतनीकरण अल्पावधीतच काळेकुट्ट!प्लास्टर भिंत सोडून पडू लागले; संबंधित विभागाने लक्ष द्यावे - एस.एम.युसूफ
बीड (एस.एम.न्युज) - शहरातील बशीरगंज भागात असलेल्या ऐतिहासिक राजुरीवेस चे केलेले नूतनीकरण अल्पावधीतच काळेकुट्ट पडले असून नूतनीकरण करताना केलेले प्लास्टर भिंत सोडून पडू लागल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. अशी मागणी केली आहे. बीड शहरात असलेल्या ऐतिहासिक वेशींपैकी राजुरीवेस ही एक महत्त्वाची व देखणी वेस आहे. शहरातील सर्व वेशींसह राजुरीवेस ची अवस्था ही खराब झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील एकूण एक वेस चिंताजनक अवस्थेत आल्या होत्या. वेशींच्या डागडुजी व नूतनीकरणासाठी वेळोवेळी जनतेकडून मागणी होत होती. म्हणून साधारण दोन वर्षापूर्वी शहरातील ऐतिहासिक वेशींचे नूतनीकरण करण्याचे कार्य संबंधित विभागाने सुरू केले. त्यापैकी कागदी वेस नूतनीकरणाविना आज पर्यंत ही तशीच पडून आहे. तर जुना बाजार येथील नदीकाठच्या वेशीचे नूतनीकरण अपूर्णावस्थेत सोडून देण्यात आले आहे. बाकीच्या वेशींचे नूतनीकरण करण्यात आले. त्यापैकीच एक असलेल्या राजुरीवेस चे नूतनीकरण करण्यात आले होते परंतु या नूतनीकरणाला जेमतेम एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटत नाही तोच केलेले नूतनीकरण काळेकुट्ट पडले आहे. शिवाय वेशीच्या भिंतींना केलेले प्लास्टर निखळून पडू लागले आहे. अशापद्धतीने जर नूतनीकरणाचे प्लास्टर काळेकुट्ट होवून पडू लागले तर अल्पावधीतच वेसची अवस्था पुन्हा चिंताजनक होईल यात दुमत नाही आणि संबंधित विभाग पुन्हा एकदा नव्याने नूतनीकरण करेल ? याची शाश्वती नाही. म्हणून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही आणि कार्य करावे. अशी मागणी केली आहे.
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा