Breaking News

जि.प.माध्यमिक शिक्षकांची दिवाळी किंचित आनंदात *ऑगस्ट महिन्याचे वेतन नोव्हेंबर मध्ये मिळाले! *सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

बीड - जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर चे वेतन अजूनही थकित आहे. यामुळे माध्यमिक शिक्षकांची दिवाळी किंचित आनंदात साजरी होणार असून शिक्षकांना उर्वरित दोन महिन्यांचे वेतन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा दिला आहे.
         या बाबत सविस्तर असे की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेसह शासन-प्रशासनकर्ते सुद्धा आर्थिक दृष्ट्या सैरभैर झाल्याचे दिसून येत असले तरी शासनकर्ते शासकीय-प्रशासकीय खात्यांचे वेतन नियमितपणे देत आहे. पण बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांचे वेतन मात्र ऑगस्ट महिन्यापासून देण्यात आले नव्हते. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने जिल्हाभरातील २६५ माध्यमिक शिक्षकांवर आर्थिक विवंचनेत राहण्याची वेळ आली होती. यामुळे ९ नोव्हेंबर रोजी या प्रश्नाविषयी स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचा फोडली असता याची शिक्षण संचालक पुणे, यांनी दखल घेऊन माध्यमिक शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे थकीत वेतन शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आले. यामुळे जि.प.च्या माध्यमिक शिक्षकांची दिवाळी किंचित आनंदात साजरी होणार असली तरी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचे वेतन अजून थकितच आहे. हे वेतन जि.प.च्या माध्यमिक शिक्षकांना मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असा इशारा पत्रकार तथा शिक्षणमित्र या नात्याने दिला आहे.

एस.एम.युसूफ
पत्रकार तथा शिक्षण मित्र
आसेफनगर, बीड.
संपर्क - 9021 02 31 21.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत