Breaking News

महावितरण कंपनीने बीड शहरवासियांचा चालविला छळ आमदार, खासदार लक्ष देऊन हा छळ थांबवतील का?

महावितरण कंपनीने बीड शहरवासियांचा चालविला छळआमदार, खासदार लक्ष देऊन हा छळ थांबवतील का?

बीड।एस.एम.न्युज़
लोड शेडिंग नसतानाही महावितरण कंपनीने अनियमित विद्युत पुरवठा करून बीड शहर वासियांचा अक्षरशः छळ चालविला आहे. यामुळे बीड शहरातील नागरिक जाम वैतागून गेले असून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार लक्ष देऊन हा छळ थांबवतील का? असा उद्विग्न प्रश्न बीड शहरवासीय उपस्थित करत असल्याचे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा  मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
                  याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बीड शहरात दिवस असो की रात्र महावितरण कंपनीकडून सातत्याने अनियमित विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. दर दिवशी २४ तासातून १० वेळेस लाईट बंद होऊ लागली आहे. एकदा लाईट बंद झाली की ती तासनतास येत नाहीये. यामुळे तप्त उन्हाने अगोदरच अंगाची लाही लाही झालेले बीड शहरवासीय विद्युत पुरवठ्याच्या खेळखंडोब्याने जाम वैतागले आहेत. विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्याने बाजारपेठेत उद्योग करणारे एसी धारक, घरोघरी कुलर व पंख्यांचा वापर करणारे नागरिक असे सर्वचजण हवालदिल झाले आहेत. अगोदरच सूर्य आग ओकत असल्याने दर दिवशी तापमान ४०-४१ अंशाच्या वर राहत आहे. अशा तापमानात काही प्रमाणात का होईना गारवा देणारी विद्युत उपकरणे वापरून तप्त उन्हाने होत असलेली जीवाची लाही लाही कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीड शहरवासीयांचा महावितरण कंपनीने अक्षरशः छळ चालविला आहे. महावितरण कंपनीच्या या अनागोंदीकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देणारा कुणी शासन-प्रशासनात आहे की नाही? तसेच बीडकरांनी निवडून दिलेले आमदार, खासदार याकडे लक्ष देऊन महावितरण कंपनीला विद्युत पुरवठा सुरळीत करून बीड शहरवासीयांचा होत असलेला छळ थांबविणार की नाही? असे प्रश्न अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे वैतागलेले बीड शहरवासीय उपस्थित करत असल्याचे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत