Breaking News

आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या “हालात बदल सकते हैं!” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्या “हालात बदल सकते हैं!” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक मार्गदर्शन कार्यक्रमाने लोणार गाजविले

लोणार (एस.एम.न्युज़) - पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व उच्चशिक्षित वक्ते आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी हालात बदल सकते है या प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रमाने लोणार गाजविले.

जमीयत उलमा ए लोणार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “हालात बदल सकते हैं” या विषयावरील  कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, उच्चशिक्षित व प्रख्यात सामाजिक मार्गदर्शक आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी उपस्थितांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी, शुक्रवार रोजी नमाज़ ए ईशा नंतर रात्री ८ः३० वाजता मोहम्मदी मशीद, जम-ज़म कॉलनी, लोणार, जि. बुलढाणा येथे पार पडला. यावेळी    बहुसंख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणात आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी समता, समानता, बंधुप्रेम, भाईचारा व सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले व आपले अनुभव ही व्यक्त केले. देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या परीने योगदान द्यावे, देशाला समृद्ध बनवण्यासाठी सामाजिक  कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या समाजाला,  गावाला, शहराला, देशाला व संपूर्ण जगाला आपल्याकडून लाभ व्हावे, या उद्देशाने सर्वांनी नियोजन व कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना केले.

कार्यक्रमास परिसरातील उलेमा, सामाजिक कार्यकर्ते, युवक, पोलीस, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जमीयत उलमा ए लोणारचे अध्यक्ष ॲड.हाजी मुहम्मद रिज़वान जड्डा यांनी सर्व उपस्थितांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. शेवटी सामूहिक दुवा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत