एशिया न्यूज यूट्यूब चैनल, वेब पोर्टल ची थाटात सुरुवात
एशिया न्यूज यूट्यूब चैनल, वेब पोर्टल ची थाटात सुरुवात
वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काज़ी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
*बीड (एस.एम.न्युज़) -* शहरातील बार्शी रोड स्थित हॉटेल गोल्डन चॉईस येथे एशिया न्यूज यूट्यूब चैनल व वेब पोर्टल ची थाटात सुरुवात करण्यात आली. वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काज़ी यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.
मरहूम पत्रकार रईस खान फ़तेहाबादी यांचे काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले होते. ऐन तारूण्यात त्यांच्या निधनामुळे कोसळलेल्या दुःखातून सावरत त्यांच्या सुविद्य उच्चशिक्षित पत्नी अस्मा रईस खान यांनी पतीचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून लोकशाहीत असलेल्या या चौथ्या आधारस्तंभाच्या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करावे. समाजातील दीनदुबळ्या, सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या हेतूने एशिया न्यूज ची मुहूर्तमेढ रोवली.
एशिया न्यूज च्या माध्यमातून आता संपादिका अस्मा रईसखान या युट्युब वर आपल्या लेखणीतून समाजातील अनेक प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर वेब पोर्टलच्या माध्यमातून घटना घडताच त्याचे वृत्तांकन प्रसिद्ध करणार आहेत.
अशा या एशिया न्यूज च्या सुरुवातीनिमित्ताने दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता थाटात उद्घाटन समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वृत्तपत्र क्षेत्रातील संपादक, पत्रकार, शिक्षकवृंद, व्यवसायी, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वक्फ़ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ संपादक आणि मार्गदर्शक काज़ी मखदूम, पत्रकार जावेद पाशा, कार्यकारी संपादक साजेद सलीम, उपसंपादक रियाज़ खान, भाजप नेते नवनाथ शिराळे, अल्पसंख्यांक नेते शेख इर्शाद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, पोलीस जमादार शेख समीर बागवान, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह शेकडोंच्या संख्येने सभागृह खचाखच भरले होते.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी अस्मा रईस खान यांनी केलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले तर त्यांनी या क्षेत्रात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावी अशा सदिच्छा व्यक्त करत भरभरून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन अब्दुल रहीम गुलाम साकिब यांनी केले.
*- सूचना -*
१) बातमी लिहून पाहिजे असल्यास कृपया विषयासोबतच रक्कम ही पाठवावी, म्हणजे बातमी वेळेवर तयार करून पाठविता येते.
२) दर शुक्रवारी कॉलिंग आणि व्हाट्सअप दिवसभर सुरू असते.
३) प्रत्येक शनिवार ते गुरुवार अपरिहार्य कारणास्तव दररोज सकाळी १०:३० ते रात्री ०९:०० वाजेपर्यंत माझा मोबाईल बंद असतो.
४) शुक्रवार वगळता बातमी व कार्यालयीन निवेदन लिहून पाहिजे असल्यास कृपया सकाळी १०:०० वाजे पूर्वी किंवा रात्री ०९:०० वाजे नंतरच संपर्क साधावा म्हणजे गैरसोय होणार नाही.
- एस.एम.युसूफ़ (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड
संपर्क - 9021 02 3121



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा