भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांविरोधात सलीम बापूंचा यलगार
भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांविरोधात सलीम बापूंचा यलगार
ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांचा सुळसुळाट झाला असून भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नावाने माहितीचा अधिकार व निवेदने देऊन ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांचा सुळसुळाट झाला आहे. या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार सर्रासपणे होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयात आणि विशेष करून शैक्षणिक संस्थांवर माहितीचा अधिकार व निवेदने टाकून भ्रष्टाचाराचा विरोध या नावाने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकडण्याचे काम केले जात आहे. भ्रष्टाचार समितीच्या नावाने एकच व्यक्ती वारंवार त्याच कार्यालयात माहितीचे अर्ज टाकून मिरवतांना दिसत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष असे स्वतःसाठी स्वतःच अशी पदे तयार करून शासकीय कार्यालयात मिरवून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून ब्लॅकमेलिंग करण्याचे गोरखधंदे केले जात आहे. अशा सर्व भामट्यांवर वचक आणण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती कार्यरत असताना जिल्ह्यात स्वयंघोषित अनेक भ्रष्टाचार निर्मूलन समित्या कार्यरत असल्याचे दिसत आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना भ्रष्टाचार निर्मूलन समिती या नावाने समित्या नोंद करून देण्याचा अधिकार आहे का? जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नावाने अशा किती समित्या आहे? त्या समित्यांचे पदाधिकारी कोण-कोण आहे? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? ती संपत्ती कुठून आली आहे? याची माहिती जिल्हाधिकारी साहेबांनी घेऊन अशा भामट्या ब्लॅकमेलिंग करणाऱ्या भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व त्या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकातून केली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा