Breaking News

आत्माराम वाव्हळ यांना 'जननेता सन्मान 2025 पुरस्कार' जाहीर

आत्माराम वाव्हळ यांना 'जननेता सन्मान 2025 पुरस्कार' जाहीर

सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

बीड (एस.एम.न्युज़) - सायं. दैनिक जननेता च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंत व्यक्तींना जननेता सन्मान 2025 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा शिदोड येथील श्री. महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे आत्माराम वाव्हळ सर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सायं. दैनिक जननेता च्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना जननेता सन्मान 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याचे व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सदैव सहभागी असणारे राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रश्नावर सातत्याने लढा देणारे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक तसेच आदर्श पत्रकार, संपादक या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आत्माराम वाव्हळ यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची जननेता सन्मान 2025 या पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख संपादक नंदू गायकवाड यांनी दिली. सदर पुरस्काराचे वितरण दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. सदरील दैनिक जननेता सन्मान 2025 पुरस्कार मिळाल्याबद्दल आत्माराम वाव्हळ सर यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत