मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकाने पर्यवेक्षकांच्या मानधनावर मारला डल्ला! नीट परीक्षेत बीडमध्ये मानधन घोटाळा! चौकशी करून कारवाई करण्याची होतेय मागणी
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकाने पर्यवेक्षकांच्या मानधनावर मारला डल्ला!
नीट परीक्षेत बीडमध्ये मानधन घोटाळा!
चौकशी करून कारवाई करण्याची होतेय मागणी
बीड (एस.एम.न्युज़) - शहरात नीट परीक्षेचे परीक्षा केंद्र असलेल्या एका शाळेत पर्यवेक्षकांच्या मानधनात घोटाळा झाल्याची उघड चर्चा जिल्हाभरात होत असून एका शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकाने संगणमत करून पर्यवेक्षकांसाठी येणाऱ्या मानधनावर डल्ला मारल्याची चर्चा जोरात होत आहे. या संबंधी जिल्हा प्रशासनाने चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. अशी मागणी होवू लागली आहे.
याविषयी थोडक्यात वृत्त असे की, नुकतेच दिनांक 4 मे 2025 रोजी नीट ची परीक्षा पार पडली. या परीक्षेचे केंद्र इतर शाळांप्रमाणे बीड शहरातील एका शाळेतही होते. त्या शाळेतही या परीक्षेसाठी पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना देण्यात येणारे मानधन हे प्रत्येकी 2 हजार रुपये होते. हे मानधन त्या शिक्षकांना पूर्ण मिळणे अपेक्षित असताना त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांनी संगणमत करून पर्यवेक्षक असलेल्या शिक्षकांना प्रत्येकी हजार रुपयेच दिले. बाकीच्या रकमेवर संगणमत करून डल्ला मारला. या बाबीला पर्यवेक्षक असलेल्या काही शिक्षकांनी विरोध केला असता अशा शिक्षकांना बोलावून त्यांना गुपचूपपणे उरलेले एक-एक हजार रुपये दिले मात्र बाकीच्या शिक्षकांची एक हजार रुपयांवरच बोळवण करण्यात आली. सदरील मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पर्यवेक्षकांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात घोटाळा करत असल्याचेही चर्चिले जात आहे. यामुळे ही बाब पाहता शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. याची शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी होऊ लागली आहे.
*अशा मुख्याध्यापकांना बेड्या ठोकण्याची गरज*
शिक्षकी सारख्या नवीन समाज घडविणाऱ्या तसेच आपल्या भारतीय संस्कृतीत जन्मदात्या आई-वडिलांसोबतच मानाचे स्थान असणाऱ्या शिक्षकांनीच जर इतर शिक्षकांचे मानधन अशाप्रकारे गैरमार्गाने घेतले तर अशा शिक्षकांकडून विद्यार्थीच काय समाजाने काय आदर्श घ्यावा? असा प्रश्न निर्माण होत असल्याने या प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापकासह उपमुख्याध्यापकालाही बेड्या ठोकण्याची गरज आहे.
*शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष*
अशाप्रकारे पर्यवेक्षक असलेल्या शिक्षकांचे अर्धे मानधन स्वतःच्या खिशात टाकणाऱ्या मुख्याध्यापकासह उपमुख्याध्यापकावर शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करतात? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा