Breaking News

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी; अविनाश पाठक यांची अखेर बदली मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष


विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी; अविनाश पाठक यांची अखेर बदली

मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष
बीड (एस.एम.न्युज़) - जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली असून आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून तरुण तडफदार आयएएस अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदावरून पाठक यांची अवघ्या दहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदी नियुक्ती होण्यापूर्वी पाठक हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा राहिले होते. या दोन्ही पदांवर एक अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी यथातथाच राहिली. या दोन्ही पदांवर असताना त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्यांना ते कधीही वेळ देत नसायचे. यामुळे या दोन्ही पदांवर असताना त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांची कामे झाली नाहीत म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्या बदलीची वाट पाहूनच होती. एकदाची आता त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने सर्वसामान्य जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यांची बदली झाली असली तरी ते एक निष्क्रिय जिल्हाधिकारी म्हणून जनतेच्या लक्षात राहतील एवढे मात्र खरे.

विवेक जॉन्सन यांच्याकडून अपेक्षा

आता बीड चे जिल्हाधिकारी म्हणून तरुण तडफदार आयएएस अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य बीडकरांना चांगल्या कामाची अपेक्षा राहणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी पदी येण्याअगोदर विवेक जॉन्सन हे चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीकडे लक्ष

बीड जिल्हावासी जनता गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदल्यांकडे लक्ष ठेवून आहे. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हाव्या म्हणून वेळोवेळी मागणी ही होत होती. त्यापैकी अविनाश पाठक यांची बदली झाली आहे. तर बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या सतत वादग्रस्त ठरत असूनही तसेच त्यांचा हुकूमशाही कारभार आणि दांडी यात्रेविरुद्ध सर्वसामान्य जनतेपासून ते नगरसेवकांपर्यंत आणि प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा सतत आवाज उठत असताना देखील त्यांची बदली होत नसल्याने जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अंधारे यांच्या बदलीकडे सुद्धा जनता लक्ष ठेवून आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत