Breaking News

पत्रकार मुहम्मद मुस्लिम कबीर यांना आफताब ए सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कार जाहीर


पत्रकार मुहम्मद मुस्लिम कबीर यांना आफताब ए सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कार जाहीर

लातूर (एस.एम.न्युज़) - लातूर जिल्हा उर्दू मीडिया प्रमुख मुहम्मद मुस्लिम कबीर यांना खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संघटने तर्फे "आफताब ए सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य)  पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मुहम्मद मुस्लिम कबीर सर हे उर्दू जगतात "रोशन औसवी" म्हणून ओळखले जाते. रोशन औसवी यांच्या गझल, कविता, उर्दू , मराठी आणि हिंदी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात. तसेच ते सा.लातूर रिपोर्टरचे सहसंपादक आणि स्तंभलेखक देखील आहेत. ते प्रत्येक वेळी आपले विचार मांडतात. कबीर बानी या नावाने त्यांचे स्तंभ लेख सुद्धा वाचनीय असतात. याशिवाय ते गेल्या चाळीस वर्षांपासून  मराठी, हिंदी आणि उर्दू पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते अनेक उर्दू वृत्त वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
कबीर सरांचा उर्दू भाषा विषयी असलेला स्नेह आणि उर्दू भाषा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नाचा विचार करून नांदेडच्या खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संस्थेने विभागीय पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. मुहम्मद मुस्लिम कबीर यांना आफताब ए सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व पत्रकार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन केले जात असून पुढील कार्यासाठी हृदयी शुभेच्छा देण्यात येत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत