Breaking News

प्रसार माध्यमांविषयी खुले मनोगत पत्र


हॅलो नमस्कार 

मी रुपाली देशपांडे.

आजचा विषय मी घेतला आहे, "मीडिया". मग तो वर्तमानपत्र असो किंवा इलेट्रॉनिक मीडिया असो. लोकशाहीत लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी प्रामुख्याने चार आधारस्तंभ असल्याचे नेहमी म्हटले जाते. त्यापैकी पहिले संसद म्हणजेच कायदे मंडळ. दुसरे सरकार म्हणजेच कार्यकारी मंडळ. तिसरे न्यायपालिका म्हणजेच न्यायालय आणि चौथे आधारस्तंभ प्रसिद्धी माध्यम म्हणजेच मीडिया.

मीडिया म्हणजेच प्रेस. आज खरोखरच या समाजात मीडिया ला खरे आधारस्तंभ समजले जाते का? याचे काय कार्य असते हे सर्वाना माहीतच आहे. सर्वसामान्य लोक तर जे दाखवलं जातं किंवा जे छापून येतं त्यालाच प्रमाण मानतात. म्हणूनच ठरवलं कि आता यावर लिहावं. पण तत्पूर्वी हेही सांगून टाकते की, माझे हे मनोगत पत्र जर कुणाला वाईट वाटले तर कृपया क्षमा असावी. कारण आता मीडिया पाहिल्या सारखा राहिला नाही. मीडियावरून सर्वसामान्य लोकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे. याला जबाबदारही मीडियाच आहे.

छोट्या बातमीला विनाकारण मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देणे आणि एखादी चांगली महत्वाची बातमी कुठेतरी कोपऱ्यात घेणे. खरंतर लोकांसाठी असणारा मीडियाच आता आर्थिक दृष्टिकोन समोर ठेवून ठरवितो की, कोणत्या बातमीला किती फुटेज द्यायचे. मीडिया आता सर्वसामान्य लोकांचा न राहता जो पैसे देईल त्यांचा झाला आहे. हे प्रचंड खेदाने नमूद करावेसे वाटते. या माझ्या लिखाणातून अनेक मीडियावाले चिडू शकतात. पण हे सारं वास्तव आहे. आणि आता हे लोकांना कळून चुकले आहे.

पुर्वी वाचक आणि मीडिया यांच्यात एक नाते होते. अनेक वर्षांचे असलेले हे नाते आता संपत आले आहे. मीडियाकर्त्यांनी आता ठरवलंच आहे कि, आपल्याला कोण मोठे करेल आपण त्यांचेच होऊन त्यांना प्रसिद्धी द्यायची? या धोरणामुळे वाचक हा खूप डळमळीत व कुंठीत होतो आहे, हे त्रिवार सत्य आहे. खरं तर काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्र म्हणजे समाजाचा आरसा असायचा. मीडिया जोपर्यंत विकला गेला नव्हता तोपर्यंत मीडिया ला आरसा समजले जायचे. आता या आरश्यात समाजाचं प्रतिबिंब दिसत नसून मीडिया विकला गेला हे वाचकांना दिसते आहे. एखादी गब्बर आसामी आली कि, त्यांचेच खरे कसे हे दाखवायचं काम मीडिया करते आहे. पण यातून मीडिया विकला गेला आहे हे हि कळते.

मीडियावाल्यांनी, आम्हालाच सारं कळतं आणि आम्ही सारं पाहतो ही समजूत काढून टाकावी. आता नव्या पिढीला अर्थातच तरुण वर्गाला मीडिया काय करतोय? हे मीडिया पेक्षा जास्त कळू लागले आहे. म्हणूनच आज तरुण पिढी बिनधास्तपणे सोशल मीडियाचा वापर करू लागली आहे.

एकेकाळी मीडियाला समाजाचा आरसा म्हणून पाहिले जात होते. म्हणूनच की काय, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या वृत्तपत्राचे नाव दर्पण ठेवले होते म्हणजेच आरसा. आज या आरश्यातच तुमचं ही प्रतिबिंब दिसतंय की, तुम्ही कुठं चालला आहात. काही वर्षात असे ही होईल कि हि नवीन पिढी खऱ्या अर्थाने मीडियात उतरतील आणि डागाळलेल्या मीडियाचा आरसा स्वच्छ पुसून खरे स्वरूपात सज्ज होतील. मग दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून ते टिळकांपर्यंत आणि टिळकांपासून आंबेडकरापर्यंत च्या आत्म्यांना आजच्या या नवीन पिढीचे कौतुक असेल. पण यात फरपट फक्त लांगूलचालन करणाऱ्या मीडियाकर्मीची होईल. विकल्या गेलेल्यांना आपल्या चुकीची किंमत हि मोजावीच लागेल. 

आताचे ताजे उदाहरण म्हणजे कुटे च्या ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेचेच घ्या. हि बँक बंद पडल्यापासून मीडिया मग ते वर्तमान पत्र असेल किंवा इलेट्रॉनिक मीडिया असेल सर्वचजण या कुटेच्या बातम्या लावत होते कि, कुटे पैसे बुडवणार नाही. कुटे लवकरच बँक उघडतील आणि सर्वकाही परत सुरळीत होईल. अश्या या कुटेच्या बातम्यांना फुटेज दिले गेले. खरं काय? खोटे काय? याचा विचारच केला नाही. आणि कुटे परिवाराला अज्ञातवासात जायला संधी दिली. तोपर्यंत कुटे मस्त मोकळे फिरत होते. खरंतर मीडिया ने बातमी उचलून धरली असती तर कुटे हा विषय कधीचाच संपला असता आणि लोकांची आताची स्थिती झाली नसती. या अश्या असंख्य बातम्या आहेत. लोकांचा पतसंस्थावरील विश्वास केव्हाच उडाला आहे. तसाच मीडियावरचा हि विश्वास उडाला आहे. हेही खेदाने नमूद करावेसे वाटते. आपण कुठे कसे विकलो गेलो? स्वतःला न विकणे आपल्या हातात आहे. मीडियावाल्यांनी सावध व्हावे. आताची मीडिया व सुरू असलेली पत्रकारिता फक्त आणि फक्त तुम्हीच वाचवू शकता.

मी कोणालाही दुखवण्याच्या हेतूने लिहिले नाही. फक्त सामान्य माणसाचे दुखणे सांगितले. जे विकले गेले त्यांना हि बातमी जिव्हारी लागेल. ज्यांनी चुकीचे लिहिले त्यांना हे मनोगत पत्र टोचेल, मनाला लागेल. पण जे विकले गेले नाही त्यांना आपल्या न विकण्याचा सार्थ अभिमान वाटेल. कोणाला यावर काही बोलायचे असेल तर माझ्या 8888955539 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता.

*लेखन - रुपाली देशपांडे*

बीड. संपर्क - *8888955539*

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

 २) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत