Breaking News

हुश्श् ..... शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर वाहनचालकांनी सोडला सुटकेचा निश्वास ! बातमी प्रकाशित होताच हटविल्या अनावश्यक बॅरिकेट्स;अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम रिक्षांचा अड्डा मात्र अबाधित !


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे समोरील रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन बॅरिकेट्स काही दिवसांपुर्वी पोलीस प्रशासनाने ठेवल्याने वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याची सोमवार दिनांक १७ जानेवारी रोजी एस.एम.न्युज़ ने बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत बातमी प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाने येथील अनावश्यक बॅरिकेट्स काढून टाकल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून काढलेल्या बॅरिकेट्स शिवाजीनगर पोलीस ठाणे च्या संरक्षक भिंती बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
याविषयी बातमी प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाने येथील अनावश्यक बॅरिकेट्स जरी हटवल्या असल्या तरी मात्र येथे पोलिसांच्याच वरदहस्ताने निर्माण झालेल्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम रिक्षाच्या अड्ड्याकडे मात्र पोलिस प्रशासनाने हेतू पुरस्सर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने टमटम रिक्षाच्या अड्ड्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनचालकांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.