भावी नगरसेवकांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या धिंगाण्यामुळे मतदारांना नवीन डोकेदुखी
बीड (एस.एम.न्युज़)- नगरपरिषदेत नगरसेवक बनुन जाण्यास इच्छुक असलेल्या भावी नगरसेवकांनी अपेक्षेपेक्षा जरा जास्तच लवकर गुडघ्याला बाशिंग बांधून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनातील नगरसेवक निवडा या शीर्षकाखाली प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियावर धिंगाणा घातला असल्याने अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या मतदारांना यामुळे एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली असून या भावींचे नंबर ब्लॉक करावे की काय ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणूक कोणतीही असो ती समोर दिसू लागली की, राजकीय क्षेत्रात वावरणारे हौसे,नवसे,गवसे भावी म्हणून फॉर्मात येतात हे तसे नेहमीचेच. यावेळी मात्र बीड नगर परिषदसाठी होणारी आगामी सार्वत्रिक निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या भावी नगरसेवकांनी बीड नगर परिषदेत नगरसेवक बनून जाण्याच्या लालसेपोटी प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गुडघ्याला बाशिंग बांधून सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आपल्या मनातील उमेदवार/नगरसेवक निवडा या शिर्षकाखाली इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा उपयोग करून घेत या संदेशाचा भडीमार मतदारांवर सुरू केला आहे. यामुळे एकीकडे रस्ते, नाल्या, उकिरडे, कचरा, स्वच्छता, पाणीपुरवठा या प्रत्येक पातळीवर अपयशी ठरलेल्या बीड नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांमुळे अगोदरच वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेवर यामुळे एक नवीन डोकेदुखी सहन करण्याची वेळ भावी नगरसेवकांनी आणल्याचे व आता अशा अति उतावीळ भावी नगरसेवकांच्या त्रासापासून वाचण्यासाठी मतदारांनी या भावींचे मोबाईल नंबर व व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करावे की काय ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क
- एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्यूज़, बीड
मो.-9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा