रिक्षाचालकांनी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावे - जे.डी.शाह
बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्रातील परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून रु.१५००/- एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत दिनांक १९.०४.२०२१ रोजी मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. तरी बीड जिल्ह्यातील रिक्षाचालक यांनी विनाविलंब आपली संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्जाद्वारे करावी. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाहभाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आपल्या बीड जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक रिक्षाचालक आहेत मात्र त्यांची संपूर्ण माहिती बँक अकाऊंट, आधार कार्ड, आर.टी.ओ. कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांना अनुदान देण्यात अनेक अडचणीं आल्या होत्या. यामुळे राज्य शासनाने थेट अनुदान देण्याबाबत नवीन कार्यप्रणाली तयार करून ती आय.सी.आय.सी.आय. बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी बीड जिल्ह्यामधील रिक्षाचालक व संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण सुरू झाले आहे. या प्रयोजनार्थ शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला असल्याने ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार असल्याने रिक्षा चालक-मालकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते जे.डी. शाहभाई यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
=============
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्यूज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 0 2 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा