Breaking News

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुहम्मद अन्वर यांचे दुःखद निधन
बीड (एस.एम.न्युज़) - येथील मिल्लिया प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच माझे काका शेख मुहम्मद अन्वर अहेमद यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
        शहरात त्यांना आदराने अन्वर मौलीसाहब म्हणून ओळखले जायचे. ते अत्यंत मनमिळावू व साध्या सरळ स्वभावाचे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे शनिवार दिनांक १७ एप्रिल च्या मध्यरात्री ०१.०० वाजण्याच्या सुमारास हृदयाघाताने निधन झाले. त्यांची नमाज़-ए-जनाज़ा सकाळी ०८.३० वाजता तकिया मस्जिद येथे पठण करण्यात आली. आणि दफनविधी मोमीनपुरा येथील जमाअत-ए-महेदविया दायरा कब्रस्तान मध्ये सकाळी ०९.०० वाजता करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून ते माझे चुलते होते.
 ---------------------------------------------------

एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत