निर्भीड पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्रसिंग ढाका तर शहर उपाध्यक्ष पदी मुहम्मद मोईज़ोद्दीन
बीड (एस.एम.न्युज) - निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्रसिंग ढाका तर शहर उपाध्यक्ष पदी मुहम्मद मोईज़ोद्दीन यांची निवड करण्यात आली.
दैनिक सिटिझन कार्यालयात घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संपादक शेख मुजीब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी निर्भीड पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब, शहराध्यक्ष एस.एम.युसूफ, वरिष्ठ पत्रकार अनिल ससाने (मामा), पत्रकार शेख तालेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवेंद्रसिंग ढाका यांनी म्हटले की,निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवनिर्वाचित बीड शहर उपाध्यक्ष मुहम्मद मोईज़ोद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, निर्भीड पत्रकार संघाचे शहराध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार तथा एस.एम.न्यूज चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ यांच्या खांद्याला खांदा लावून बीड शहरात निष्पक्ष, निर्भीड, सडेतोड व परखड पत्रकारितेची मशाल अखंडपणे तेवत ठेवणार आहोत. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या या मनोगतांचे सर्व उपस्थितांनी स्वागत करुन कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा