Breaking News

बीड नगरपालिकेला कोंडवाड्यांचा विसर!मोकाट जनावरांना पकडून दंडीत करण्याचे कार्य पोलिसांना तरी द्यावे - एस.एम.युसूफ

 बीड (एस.एम.न्युज) - शहरात जिकडे-तिकडे चोहीकडे सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे रस्त्यांच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रासास सामोरे जावे लागत आहे. बीड नगरपालिकेला कोंडवाड्यांचा विसर पडल्याने किंवा धमक नसल्याने मोकाट जनावरांना पकडून दंडीत करण्याचे कार्य आता पोलिसांना तरी द्यावे. अशी मागणी केली आहे.
       बीड नगरपालिकेला कोंडवाड्यांचा विसर पडल्याने किंवा धमक नसल्याने मोकाट जनावरे रस्त्यांवर ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे वाहनचालकांना अतोनात त्रास होत आहे. शहरातील बाजारपेठ आणि वाहतुकीने गजबजलेल्या अशा साठे चौकापासून ते आंबेडकर चौक येथून मोंढा आणि चांदणी चौकापर्यंत. बलभीम चौक ते शिवाजी चौक पर्यंत. बशीरगंज चौक ते नवी भाजी मंडई मार्गे सुभाष रोडच्या चौकापर्यंत. जिल्हा स्टेडियम रोड, शहर पोलीस ठाणे समोरून जाणाऱ्या डीपी रोड ते मोंढा रोड पर्यंत. शिवाजी चौक ते बार्शी नाका तेथून तेलगाव नाका तेथून नाळवंडी नाका तेथून आंबेडकर चौकापर्यंत. शिवाजी चौक ते हॉटेल साई पॅलेस पर्यंत. शिवाजी चौक ते ग्रामसेवक कॉलनी पर्यंत अशा जवळपास शहराच्या प्रत्येक मुख्य रस्त्यांवर मोकाट सोडलेल्या जनावरांचा कळपा-कळपाने वावर व ठिय्या पहाटे पासून ते संध्याकाळ पर्यंत सातत्याने सुरूच आहे. अशा मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याचा नियम, दंडित करण्याची प्रथा याचा बीड नगरपालिकेला विसर पडल्याने किंवा धमक नसल्याने मोकाट जनावरांचा शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यांवर मुक्त वावर व ठिय्या असतो. यामुळे वाहनचालकांना आतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता माणसांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी मोकाट जनावरांना पकडून दंडीत करण्याचे कार्य पोलिसांना तरी द्यावे. अशी मागणी  केली आहे.
एस.एम.युसूफ
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत