पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जेलरोड पोलीस ठाण्यात सॅनिटायजर व मास्क वाटप
सोलापूर(एस.एम.न्युज़) - पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका शासन दरबारात मांडून पत्रकारांचे प्रश्न सोडवनाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सामाजिक भान ठेऊन आजपर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवले असून सध्या जगात, देशात,राज्यात , सोलापूर शहरात कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून या रोगाला अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य यंत्रणा आपले कुटुंब बाजूला ठेवून व जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावत असून यात पोलीस प्रशासन मोठया प्रमाणात आपला जीव धोक्यात घालत आहे. दिवसरात्र शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त करत असून अश्या जिगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निरोगी आरोग्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जेलरोड पोलीस ठाण्यात सॅनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले.जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे व पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याहस्ते पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना सॅनिटायजर व मास्क चे वाटप रिजवान शेख यांच्या कल्पनेतून करण्यात आले.यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार , शहर कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी , वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद, जैद बागवान, इस्माईल शेख, रोहित घोडके, युनूस अत्तार शब्बीर शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
===================
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
आसेफ़ नगर,बीड.
संपर्क क्र.- 9021 02 3121
E-mail :- smyusuf4371@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा