नरेगा चे मानधन सहा महिन्यांपासून थकीत कर्मचारी हवालदिल; उपासमारीची वेळ!
नरेगा चे मानधन सहा महिन्यांपासून थकीत
कर्मचारी हवालदिल; उपासमारीची वेळ!
बीड।एस.एम.न्युज़
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) कार्यरत कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याने ते हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
नरेगाचे कर्मचारी नियमितपणे गावागावात योजना राबविणारे, कामांची पाहणी करणारे व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणारे असले तरी आज ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत. वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, वीजबिल आणि दैनंदिन गरजा भागविताना कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कर्ज काढून संसार चालवावा लागत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर पूर्ण पगाराची पक्की नोकरी नाही अत्यंत तुटपूंज्या मानधनात कर्मचारी कसेबसे आला दिवस काळात असताना तेही गेल्या सहा महिन्यापासून मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नरेगा ही ग्रामीण भागातील रोजगाराची महत्त्वाची योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेतात. मात्र त्यांनाच वेळेवर मानधन मिळत नसल्याने शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नरेगा योजनेअंतर्गत कामगारांच्या मजुरीबाबत तरतुदी असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न कायम असल्याची खंत व्यक्त होत आहे. नरेगा कर्मचारी संघटनांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे थकीत सहा महिन्यांचे मानधन तात्काळ अदा करावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा नरेगा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
“ग्रामीण विकासाच्या योजनांचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मानधनासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब शासनासाठी गंभीर चिंतेची आहे,” अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
👇👇👇👇👇
पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!
____________________________________________________
S.K.P. Motor Driving School
Nursery road, Beed.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा